Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदार गोव्याच्या वाटेवर; ताज हॉटेलबाहेर वाढला पोलीस बंदोबस्त - Rebel MLA In Goa
गुवाहाटीत असणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार ( Rebel MLA Shiv Sena ) आज दुपारनंतर गोव्यात दाखल ( Rebel MLA In Goa ) होतील. त्यांच्या राहण्याची व्यवस्था पणजी नजीक असणाऱ्या दोना पावला येथील ताज कन्व्हेन्शन व रिसॉर्ट पंचतारांकित हॉटेलमध्ये ( Taj Convention Hotel ) करण्यात आली आहे. यानिमित्ताने पोलीस व हॉटेल प्रशासनाच्यावतीने बंदोबस्त तैनात ( Police and hotel administration security ) करण्यात आला आहे. बंडखोर आमदारांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर शिवसेनेच्या बंडखोर आमदार, नेत्यांनी बहुमत सिद्ध केल तर राज्यात सत्तांतर होणार हे निश्चित आहे.