'काय डोंगार...काय झाडी...काय हाटील...' बंडखोर आमदार शहाजीबापू पाटलांची ऑडिओ क्लिप VIRAL - बंडखोर आमदार शहाजीबापू पाटलांची ऑडिओ क्लिप
सोलापूर - 'काय डोंगार...काय झाडी....काय हाटील' या ओळी सोशल मीडियावर तुफान ट्रेण्ड होत आहेत. या शब्दांचे जन्मदाते आहेत. सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील. गुवाहाटी येथे रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये शहाजीबापू हे मुक्कामी आहेत. बंडखोरी केल्याची साधी गंधवार्ताही त्यांनी कार्यकर्त्यांना लागू दिली नाही. तीन दिवसांनी एक जवळच्या कार्यकर्त्याने शहाजीबापू यांना ख्याली खुशाली विचारण्यासाठी फोन केला आणि शहाजीबापू पाटील मनसोक्तपणे बोलले. त्यांच्या बोलण्यात उस्फुर्तता दिसली. अगदी मोकळा ढाकळा स्वभाव असलेल्या शहाजीबापूनी गुवाहाटीचे केलेले निसर्ग वर्णन अवर्णनीय आहे.