Rebel Eknath Shinde : शिंदे गटातील आमदारांनी पैसे घेतल्याचा शिवसैनिकांचा आरोप - ठाकरे सरकार संकटात
मुंबई - सगळे पळालेले कोकणातल्या आंब्यांसारखे आहेत. कोकणात जसे आंबे एक वर्ष आड करून येतात तसाच यांचा प्रकार आहे. हे सर्व गद्दार पळाले त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी निवडणुकीला सामोरे जावे. शिंदे गटाला ( Rebel Eknath Shinde ) शिवसेनेने मोठे केले आहे. आज शिवसेनेशीच हे लोक गद्दारी करत ( Shinde group betrayed Shiv Sena ) आहेत. कसली यांची नाराजी मुख्यमंत्री वेळ देत नाहीत म्हणून मुख्यमंत्र्यांनी राज्याचा कारभार व्यवस्थित चालवला आहे. हे सगळे आमदार पैसे खाऊन बसल्याचा ( Shiv Sena MLA taking money ) आरोप शिवसैनिकांनी केला आहे.