Kolhapur Shiv Sena :...म्हणून कोल्हापुरातील शिवसेनेवर आली पुनर्बांधणी करण्याची वेळ - खासदार संजय मंडलिक
कोल्हापूर - शहरातील शिवसेनेने सर्वच कार्यकारिणी बरखास्त केली आहे. शिवाय येत्या 31 ऑगस्टपर्यंत शिवसेनेची पुनर्बांधणी करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पण नेमकी पुनर्बांधणी करण्याची वेळ का आली ? याबाबत खासदार संजय मंडलिक ( MP Sanjay Mandlik kolhapur ) यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय एकूणच जिल्ह्यातील शिवसेनेच्या पुढील प्रवासाबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.