VIDEO : उदयनराजेंना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्याने समर्थक नाराज, भाजप वापर करत असल्याची भावना - उदयनराजे भोसलेंना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी नाही
मोदी सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना खासदार उदयनराजे भोसले यांना डावलल्याने साता-यात उदयनराजे प्रेमींचा अपेक्षाभंग झाला आहे. 'मुळात यावेळी उदयनराजे फारसे इच्छुक नव्हते. त्यामुळे त्यांचे नावही चर्चेत नव्हते' असे काही जवळच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तर 'भाजप त्यांच्या रीतीप्रमाणे उदयनराजे यांचा राजकीय वापर करत असल्याचे मत राजकीय निरीक्षकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना नोंदवले. भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळात चार जणांना संधी दिली मात्र राज्यसभा सदस्य साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांना बाजूला ठेवल्याची भावना राजेसमर्थकांमध्ये पाहायला मिळत आहे. भाजपने उदयनराजे यांना डावलून मोठी चूक केली. त्याची किंमत पक्षाला उद्याच्या काळात मोजावी लागेल,' अशी प्रतिक्रिया सातारा हॉकर्स संघटनेचे शहराध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केली