VIDEO : पुण्यात आज राज 'गर्जना', कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त - राज ठाकरे सभा पुणे
पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ( Raj Thackeray rally at pune ) आज सकाळी 10 वाजता पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे सभा होणार आहे. या सभेसाठी राज्यभरातील कार्यकर्ते हे गणेश कला क्रीडा मंच येथे दाखल झाले आहेत. शहरभर मनसैनिकांनी फलक लावून वातावरण निर्मिती केली आहे. मोठ्या प्रमाणात या सभेसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून आजच्या सभेत राज ठाकरे हे काय गर्जना करणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथील ( Raj Thackeray rally news pune ) आढावा घेतला ईटीव्ही भारत प्रतिनिधीने.