2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी खरेदी केली 50 हजार रुपयांची पुस्तके! - पुस्तक खरेदी राज ठाकरे पुणे
पुणे - राज ठाकरे यांनी पुण्यातील अक्षरधारा बुक गॅलरीमधून ( Raj Thackeray bought books in Pune) मराठा सियासत या पुस्तकांचा खंड खरेदी केला. तसेच पन्नास हजारांची पुस्तके त्यांनी विकत घेतली. यामध्ये दीडशेपेक्षा जास्त पुस्तकांचा समावेश आहे. पुस्तक खरेदी करताना इतिहास विभागात जास्त वेळ ते रमले, असे अक्षरधाराचे मालक राठीवडेकर यांनी सांगितले. पुस्तके खरेदी केल्यानंतर त्यांनी बाहेर येऊन लोकांना अभिवादन केले.