Rain Slowed Down : मुंबईत पावसाची सकाळच्या सुमारास उघडीप - मुंबईत पाऊस ओसरला
मुंबई - सलग दोन दिवस मुक्काम ठेवून मुंबईला झोडपून काढलेल्या पावसाचा जोर आज सकाळच्या सुमारास थोडा ओसरला. ( Rain Slowed Down ) मात्र, अधूनमधून पावसाची रिमझिम सुरुच होती. याचा तितकासा परिणाम जाणवला नाही. मध्य व पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत होती. सतत दोन दिवस पडलेल्या पावसाने मुंबईची दाणादाण ( Rains lash Mumbai ) उडवली. सखल भागात जागोजागी पाणी साचले होते. गांधी मार्केट, किंग सर्कल, दादर टीटी, हिंदमाता, चेंबूर, शेलकाॉलनी, चेंबूर कॉलनी, आरसीएफ कॉलनी, प्रतीक्षा नगर, मिलन सबवे, अंधेरी सबवे, वांद्रे आदी ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूकीचा बोजवारा उडाला होता. सोमवारपासून धो- धो कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी पहाटेच्या सुमारास मात्र उघडीप घेतल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला ( Rain Slowed Down IN Mumbai ) होता.