Raigad Suspected Boat बोटीबाबत स्थानिकांमध्ये कोणतीही भीती नाही, आमदार भरत गोगावलेंचे स्पष्टीकरण - आमदार भरत गोगावलेंचे स्पष्टीकरण
मुंबई रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर एक बोट सापडली असून या Raigad Suspected Boat बोटीमध्ये 3 एके 47 बंदुकी सापडल्या आहेत. तसेच काही काडतुसे देखील सापडल्या आहेत. मात्र या हत्यारांसोबत इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियन कागदपत्र सापडली आहेत. ओमानमधून ही बोट आल्याची माहिती आहे. संबंधित यंत्रणांकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे थोड्याच वेळात याबाबत स्पष्टता येईल, असे मत रायगड महाडचे आमदार भरत गोगावले Raigad Mahad MLA Bharat Gogawle यांनी व्यक्त केले आहे. तसेच या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील लक्ष घातले आहे. या घटनेने स्थानिक जनतेत कोणतीही भीती नसल्याचे भरत गोगावले यांनी सांगितले.