VIDEO : मावळ तालुक्यात पाण्याचा प्रवाहात वाहून जाणाऱ्या व्यक्तीला बचाव पथकाने वाचवले ! - Pune
गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पाऊसाने मावळ ( Maval ) परिसरातील कुंडमाळ येथे पर्यटकांची ( Tourists ) गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी एक व्यक्ती अचानक नदीत पडली आणि वाहून जाऊ लागली होती. पाण्याचा प्रवाह एवढा होता की, संबंधित व्यक्तीला त्याचा अंदाज देखील आला नाही. त्यामुळे ती व्यक्ती प्रवाहासोबत वाहून जाऊ लागली. मात्र कुंडमाळ येथे वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची रेस्क्यू टीम या पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात होती. त्या रेस्क्यू टीमने क्षणाची विलंब न करता या व्यक्तीच्या मदतीसाठी पाण्यात सेफ्टी बोट घेऊन उतरली. तोपर्यत ती व्यक्ती पाण्यासोबत वाहून जात होती. मात्र, या टीमने काही अंतर पार केल्यानंतर, त्या व्यक्तीला गाठण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे. त्यांनी त्याला वाहून जात असताना पाण्यातून ओढून बाहेर काढले. रोहन किसन सोनटक्के ( वय- 22 ) असे वाचवण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
Last Updated : Jul 11, 2022, 11:56 AM IST