महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Shrimant Kokate on Raj Thackeray : राज ठाकरेंना महाराजांची राजमुद्रा वापरण्याचा अधिकार नाही ते...: कोकटेंचा हल्लाबोल - श्रीमंत कोकाटे राजमुद्रा

By

Published : May 11, 2022, 4:39 PM IST

पुणे - राज ठाकरे ( Raj Thackeray ) हे सतत इतिहासाची मोडतोड करत चुकीची माहिती पसरवत आहेत. राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेशी आम्हाला देणे घेणे नाही मात्र ते शिवद्रोही आहेत. म्हणून जी राजमुद्रा ( rajmudra ) ते त्यांच्या पक्षासाठी वापरत आहेत, ती त्यांनी वापरू नये असा इशारा ज्येष्ठ लेखक आणि वक्ते श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत दिला ( Shrimant Kokate on Raj Thackeray ) आहे. तसेच राजमुद्रा ही स्वराज्याची अस्मिता होती. त्यामुळे तीचा उपयोग कुठल्याच राजकीय पक्षांनी करू नये, अशी भूमिका देखील त्यांनी घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली आणि तिचा शोध महात्मा फुले यांनी घेतला, हे सगळ्यांना माहिती असताना सुध्दा राज ठाकरे असे विधान करतात. हे दुर्दैव असल्याचे सांगत श्रीमंत कोकाटे यांनी राज ठाकरे हे जबाबदार नेते आहेत त्यांनी अभ्यासपूर्ण बोलायला हवे, जाती जातीत तेढ निर्माण करणे हे लोकनेत्याचे लक्षण नव्हे, असा टोला देखील राज यांना लगावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details