Video : बारमध्ये तरुणांना आणि कामगारांना पुणे पोलिसांकडून मारहाण - Pune Mundhava Police Station News
पुणे - पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच बाहेरील वस्तीतील हाॅटेल्स, बारमध्ये पहाटेपर्यंत तरुणाईच्या पार्ट्यां सुरू असतात. त्यामुळे उद्भवणारी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागामार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र असे असताना पुण्यातील मुंढवा येथील हॉटेल वॉटर बार ( Hotel Water Bar Mundhava )मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी कारवाई केली. यावेळी त्यांनी तरुणांना व कामगारांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला ( Pune police beat up youth ) आहे. तर महिला पोलिसांनी तरुणींना मारहाण केल्याचा प्रकार देखील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही पोलीस तक्रार दाखल झालेली नाही आहे.