प्लेग, स्वाईन फ्लू नंतर आता पुण्याने घेतला कोरोनाचा धसका
पुणे - राज्याची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर नेहमी गजबजलेले बघायला मिळते. शहराच्या इतिहासात बोटावर मोजण्या इतक्यावेळा रस्ते निर्मनुष्य आणि बाजारपेठा बंद झाल्या आहेत. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पुणे शहर ठप्प झाले असून निर्मनुष्य रस्ते, सुनसान चौक, ओस पडलेल्या बाजार पेठा असे चित्र दिसत आहे. पुणे शहराने 1897 मध्ये प्लेगची साथ पाहिली होती त्यानंतर 2010 मध्ये स्वाईन फ्लूची दहशत पुण्याने अनुभवली, या दोन्हींच्या प्रकोपानंतर आता पुणेकर कोरोनाची दहशत अनुभवत आहेत.