PM Narendra Modi Played Drums : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीत वाजवला मराठमोळा ढोल - PM Modi News
बर्लिन (जर्मनी) - बर्लिनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ यांच्या भारत-जर्मनी इंटर-गव्हर्नमेंटल कन्सल्टेशन्स (IGC) च्या सहाव्या सत्राचा बैठक ( PM Modi in Berlin ) झाली. यावेळी त्यांनी स्वाक्षरी केलेल्या हरित आणि शाश्वत विकास भागीदारी स्थापन करण्याच्या संयुक्त घोषणापत्राचा (JDI) भाग म्हणून (2030)पर्यंत भारताला 10 अब्ज युरो मदत देण्याचे जर्मनीने सोमवारी मान्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय समुदायाच्या सदस्यांना संबोधित करण्यासाठी बर्लिनमधील पॉट्सडॅमर प्लॅट्झ येथील थिएटरमध्ये पोहोचले होते. तेव्हा त्यांनी ड्रमवर हात ( Prime Minister of Berlin played drums In Germany ) आजमवला.