Prakash Ambedkar Exclusive : यशवंत सिन्हांनी राष्ट्रपतीच्या शर्यतीतून माघार घ्यावी; प्रकाश आंबेडकरांनी दिलं स्पष्टीकरण - प्रकाश आंबेडकर राष्ट्रपती निवडणूक
पुणे - एनडीएकडून आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिली आहे. मात्र, राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून यशवंत सिन्हा यांनी माघार घ्यावी, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली ( Prakash Ambedkar On Yashwant Sinha ) आहेत. ते 'ईटिव्ही भारत'शी बोलत होते. तसेच, महाराष्ट्राला ग्रामपंचायत केली आहे. मनाला आला तसा निर्णय घेतला मनाला आला की तो निर्णय बदलला, अशी परिस्थिती सध्या राज्यात चालली आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.