Prakash Ambedkar on Mahavikas Aghadi : राज्य सरकार पाच वर्षे पूर्ण करेल - प्रकाश आंबेडकर - महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण
अकोला - राज्य सरकारने विरोधी पक्षाची बैठक भोंग्यावर बोलवली होती. या बैठकीत दुसरा विषय घेण्यात आला नाही. त्यामुळे आम्ही 1 मे ला ज्या ठिकाणी शक्य होईल त्या जिल्ह्यात शांती मार्च काढणार आहोत, अशी माहिती 'वंचित'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar on Loudspeaker Controversy) यांनी दिली आहे. तसेच हे राज्य सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असे भाकितही प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar on Mahavikas Aghadi Government) यांनी व्यक्त केले आहे.