NIA action : NIA विरोधात पी आय ऐफ चे निदर्शने, मामाचौक येथे केली नारे बाजी - Popular Front of India
NIA च्या कारवाईविरोधात पॉपुलर फ्रंटची निदर्शने, ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्यांना सोडण्याची मागणी. काल NIA नं देशभरात पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापेमारी करून या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना टेरर फंडिंगप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. याचा निषेध करण्यासाठी आज जालन्यातील मामा चौकात पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. NIA नं बेकायदेशीर कारवाई करून पॉपुलर फ्रंटच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं असून त्यांना तातडीने सोडण्यात यावं अशी मागणी आंदोलकांनी केली. पोलिसांची परवानगी नसताना हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलना दरम्यान आंदोलकांनी RSS, बीजेपी आणि NIA विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त मामाचौक येथे होता कोणताही गैर प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी, दंगल नियंत्रण पथक, शहरातील पोलिस यांनी चोख बंदोबस्त ठेवला.