पोलिसाने भाजी विक्रेत्या महिलेचा भाजीपाला रस्त्यावर फेकला, नागरिकांमधून संताप - नागपूर जिल्हा लेटेस्ट न्यूज
रस्त्यावर दुकान लावणाऱ्या भाजी विक्रेत्या महिलेचा भाजीपाला एका पोलीस उपनिरीक्षकाने रस्त्यावर फेकून दिल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. नागपूरच्या जरीपटका भागातील ही घटना आहे. सकाळी अकार वाजता सर्व दुकाने बंद करण्यात येतात. वेळ झाली असतानाही आणि पोलिसांनी दोन वेळा सूचना देऊन देखील भाजीची विक्री सुरूच असल्याने, चिडलेल्या या पोलीस कर्मचाऱ्याने महिलेचा भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला.