CCTV Video : पोलिसाने क्षणाचाही विलंब न करता थेट हात पकडून ओढले म्हणून... : लोकलसमोरील थरारक घटना! - ठाणे लोकल अपघात
ठाणे - लोकल पकडण्याच्या नादात रेल्वे रूळ ओलांडणे किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय ठाण्यात रेल्वे स्थानक ( Thane railway station ) फलाट क्रमांक 4 वर पाहायला मिळाला आहे. जर पोलीस कर्मचाऱ्यानी वेळेवर हात दिला नसता तर युवकाला जीवाला मुकावे लागले ( Police rescued CCTV Video ) असते. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आहे. घाई करताना आपल्या जिवाचीही पर्वा करावी असे आवाहन आता या प्रकारानंतर ठाणे रेल्वे पोलीस करत आहेत. आज सकाळी 7 वाजून 47 मिनिटांना फलाट क्रमांक 4 वरील लोकल पकडण्यासाठी फलाट क्रमांक 3 वरून रूळ ओलांडून जाण्याचा नादात येणाऱ्या रेल्वेचा स्पीड न समजल्याने ती दिसल्यावर स्तब्ध झालेल्या युवकाला पोलीस शिपाई तुषार सोनताटे याने हात दिला आणि त्याला फलाटावर ओढले आणि त्याचा जीव वाचला. या प्रकाराचे सीसीटीव्ही दृश्य पाहिल्या नंतर तुषारच्या वरिष्ठांनी त्याचे कौतुक तर केले आहे. पण सर्वसामान्य नागरिकांना देखील तुषारचे कौतुक केले आहे.