VIDEO : बर्लिनमध्ये पंतप्रधानांचे स्वागत मराठमोळ्या पध्दतीने - बर्लिनमध्ये पंतप्रधानांचा दौरा
बर्लिन : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narnendra Modi) यांचे जर्मनीत (Germany) उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांचा आजपासून तीन देशांचा दौरा सुरु झालेला आहे. या दौऱ्यात जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सला मधील राष्ट्रप्रमुखांशी चर्चा करणार आहेत. या वेळेस जर्मनीत मराठी संस्कृतीचे दर्शन घडले. येथे महिलांनी पारंपारिक वेषामध्ये लेझीम खेळून मोदींचे स्वागत केले. याचबरोबर ढोल ताशाच्या वादनाचाही आवाज आसमंतात घुमला.