Video नदीच्या पुलावर गाडी वाचवायला गेला अन् गाडीसह स्वतःही गेला वाहून, पहा व्हिडीओ - कर्नाटक व्हिडीओ
कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील मधुगिरी तालुक्यात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरम्यान, आज पहाटे चंद्रगिरी गावाजवळ भरलेल्या नाल्यात ट्रॅक्टरसह दोघेजण वाहून जात होते. त्यावेळी स्थानिकांनी त्यांचे संरक्षण केले. पाण्यात तरंगणाऱ्या ट्रॅक्टरला दोरीच्या साहाय्याने ओढण्यात आले. आणखी एक घटना कोरटागेरे तालुक्यातील वडदगेरे ग्रामपंचायतीजवळ घडली. कोरटागेरे-वडडगेरे मुख्य रस्त्यावरील मलाप्पानहळ्ळी गावात नदीतील पाण्याच्या प्रवाहात दुचाकीसह वाहून जाणाऱ्या तरुणाला स्थानिकांनी वाचवले. People washed away in rain water in Karnataka VIDEO