जनता कर्फ्यूला औरंगाबादेत नागरिकांचा प्रतिसाद - औरंगाबाद जनता कर्फ्यू
औरंगाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज देशभर जनता कर्फ्यूचे पालन केले जात आहे. दिवसभरात कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. औरंगाबाद शहरात जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. पोलीस कर्मचारी देखील रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येकाला घरी जाण्याचा सल्ला देत आहेत. औरंगाबाद शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी....