VIDEO : लोकल बंद असल्याने बेस्टच्या बसेसवर प्रवाशांचा ताण; फिजीकल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा - मुंबई पाऊस
रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा ठप्प झालेली आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. मात्र, या प्रवाशांच्या मदतीसाठी मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी बेस्टच्या बसेस धावून आलेल्या आहेत. आजही मुंबईत मुसळधार पाऊस पडत असल्याने नागरिकांना आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी बेस्टच्या तीन हजार 349 बसेस चालविण्यात येत आहेत. त्यापैकी 50 बसेस पावसामुळे साचलेल्या पाण्यामध्ये अडकून नादुरुस्त झाल्या आहेत.