VIDEO : अमोल मिटकरींनी ब्राम्हण समाजाची माफी मागावी; परशुराम सेवा संघाची मागणी - ठाणे अपडेट
ठाणे :- अमोल मिटकरी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून ब्राह्मण समाज राज्यभरात आक्रमक झालेला दिसून येत आहे. ठाण्यात परशुराम सेवा संघाच्यावतीने अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याचा विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी ठाण्यातील नौपाडा पोलिस स्थानकात निवेदन देण्यात आले आहे. अमोल मिटकरी यांनी केलेले विधान चुकीचे असून त्यांनी भर सभेमध्ये ब्राह्मण समाजाची माफी मागावी अशी मागणी परशुराम सेवा संघाच्या अभिषेक समुद्रे यांच्याकडून करण्यात आली आहे. अमोल मिटकरी हे वारंवार ब्राह्मण समाजाच्या विरोधात भाष्य करत असतात. तर जर त्यांनी माफी मागितली नाही तर परशुराम सेवा संघाच्या वतीने राज्यभरात साखळी उपोषण आणि आंदोलन करण्यात येईल असा इशारा परशुराम सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच जर हे विधान बरोबर असल्याचा दावा जरा मिटकरी करत असतील तर त्यांनी त्यांचे पुरावे द्यावेत व खुलासा करावा असेही आव्हान परशुराम सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.