बैलजोडीला पालखीरथ ओढण्याचा मान मिळणे म्हणजे साक्षात 'विठ्ठला'ची सेवा - wari
यंदा संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखीरथ ओढण्याचा मान पंडीत रानवडे यांच्या सर्जा-राजा बैलजोडीला मिळाला आहे. तर संत तुकाराम महाराजांचा पालखीरथ ओढण्याचा मान पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील शेतकरी रविंद्र कोंढारे पाटील यांच्या सोन्या-सुंदर या बैलजोडीसा मिळाला आहे. आमच्या बैलजोडीला पालखीरथ ओढण्याचा मान मिळाल्याने साक्षात विठ्ठलाची सेवा करण्याची संधी मिळाल्याच्या भावना बैलांच्या मालकांनी व्यक्त केली आहे.