कंगनाच्या मनालीतील घरापासून ते मुंबईतल्या निवासस्थानापर्यंतचा घटनाक्रम... - कंगना रणौत न्यूज
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या दररोज एक ट्विट करून खळबळ उडवून देत आहे. मुंबईला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर संबोधल्याने मोठा वाद निर्माण झाला असून शिवसेना विरुद्ध कंगना असे चित्र सध्या तयार झाले आहे. त्यानंतर आज कंगना मुंबईत दाखल झाली आहे. दरम्यान, आज सकाळी कंगना तिच्या मनालीतल्या घरातून निघाल्यापासून ते मुंबईतील निवासस्थानी येईपर्यंतच्या प्रत्येक घडामोडींवर 'ई टीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी नजर ठेवली होती. त्यासंदर्भातला आज दिवसभरातील घटनाक्रम पाहा...