VIDEO : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी घेतले श्रीकालेश्वर श्रीमुक्तेश्वराचे दर्शन - फडणवीसांनी घेतले श्रीकालेश्वर श्रीमुक्तेश्वराचे दर्शन
गडचिरोली - दक्षिण भागातील तेलंगाणा महाराष्ट्र सीमेवरील सिरोंचा येथील प्राणहिता नदीकाठी पुष्करचे आयोजन १२ वर्षांनंतर पार पडत आहे. मेळाव्याच्या ११ व्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी झाल्याचे पाहायला मिळाली. याच ठिकाणी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्राणहितानदीच्या पुष्कर घाटाला भेट देत दर्शन घेतले. दिली. श्रीकालेश्वर मंदिर अत्यंत पवित्र पुण्य क्षेत्रापैकी एक असे प्रसिद्ध पुण्यक्षेत्र आहे. येथे येऊन श्रीकालेश्वर श्रीमुक्तेश्वर दर्शन जो कोणी घेतो, त्याना पुण्यफल प्राप्त होते. त्यामुळे येथे दर्शन घेऊन सर्व देशातील जनतेला सुख शांती मिळावे, अशी प्रार्थना आपण केल्याची भावना देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवली.
TAGGED:
Pranhita river Pushkar