मुलुंडमध्ये इमारतीची संरक्षक भिंत घरावर कोसळली, एकाचा मृत्यू - One dies as wall collapses in Mulund
मुलुंडच्या सालपा देविपाडा परिसरामध्ये एका इमारतीची संरक्षक भिंत दोन घरांवर कोसळल्याची घटना घडली. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी दिवसभर मुंबई उपनगरामध्ये पावसाची संततधार सुरू होती. याचदरम्यान मुलुंडच्या सालपा देवीपाडा परिसरामध्ये सागर गार्डन या इमारतीची संरक्षक भिंत शेजारी असलेल्या दोन घरांवर रात्री नऊच्या सुमारास कोसळली.