महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

बळीराजासोबत एक दिवस: लातूर - दुष्काळी झळा : 'सोनं' पिकणाऱ्या जमिनीत शेतकऱ्याच्या स्वप्नाची 'माती' - कर्ज

By

Published : Jun 20, 2019, 7:28 AM IST

Updated : Jun 24, 2019, 9:24 PM IST

लातूर - मांजरा नदीकाठी असलेल्या हरंगूळ (खु) गावच्या शिवाराची 'ग्रीन बेल्ट' म्हणून ओळख आहे. अनेक वर्षापासून या परिसरातील शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत नगदी पिके घेतात. मात्र, मागील ३ वर्षापासून या परिसरात कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हंगामी पिकेही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नसल्याचे चित्र आहे. या कारणाने सालगड्याचे पैसे आणि नातवंडांची लग्ने शेतकऱ्याला कर्ज काढून करण्याची वेळ आली आहे. हरंगूळ गावचे प्रभाकर पवार हे वयाच्या २० व्या वर्षापासून काळ्या आईची सेवा करत आहेत. शेती व्यवसायाबाबतचे ते चालते-फिरते विद्यापीठ असून पंचक्रशतील शेतकरी पिकाबाबतचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्या बांधावर येतात. मात्र, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर पर्याय काढण्यात सल्ला देणारे पवारच असमर्थ ठरत आहेत. पाहा त्यांच्यासंदर्भातील रिपोर्ट....
Last Updated : Jun 24, 2019, 9:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details