महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

बळीराजासोबत एक दिवस - बीडः पाऊस पडला, पण काळ्या आईची ओटी भरू कशी; दुष्काळात पिचलेल्या कालिदास तांदळेचा सवाल - शेतकरी

By

Published : Jun 28, 2019, 11:06 PM IST

Updated : Jun 28, 2019, 11:12 PM IST

बीड - तीन वर्षांपासून पावसाने फिरवलेली पाठ, शेतात जे काही पेरलं ते वाया गेलं, मोठ्या हिमतीने गेल्या वर्षी दीड एकर ऊस केला, वाटलं पोरांच्या शिक्षणाचा खर्च तरी भागेल. पण, ऊसाला ऐनवेळी पाणीच कमी पडलं ऊसाबरोबर माझ्या पोरांच्या शिक्षणाचं स्वप्नदेखील करपून गेलं. यंदा उसनवारी करून ६ एकर जमिनीची मशागत केली. एसबीआय बँकेकडे कर्जाची फाईल केली आहे. मात्र, ते पैसे मिळाले की उसनवारी करुन घेतलेले पैसे परत करावे लागणार. आता पाऊस पडला तरी, खरीपाची पेरणी कशी करू, असा प्रश्न बीड जिल्ह्यातील हिंगणी (खुर्द) येथील शेतकरी कालिदास तांदळे यांनी उपस्थित केला आहे. हा प्रश्न केवळ या एका शेतकऱ्याचा नाही. तर, जिल्ह्यातील दुष्काळात पिचलेल्या बहुतांश शेतकऱ्यांचा आहे. या परिस्थितीचा 'ईटीव्ही भारत' ने घेतलेला हा खास आढावा...
Last Updated : Jun 28, 2019, 11:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details