कराडमधील दीडशे वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल हलक्या चारचाकी वाहनांसाठी आजपासून खुला - हलक्या चारचाकी वाहनांसाठी खुला
लोखंडी तसेच दगडी बांधकामाचा आदर्श नमुना असलेला आणि कराडच्या कोयना नदीवर ब्रिटिश कालखंडात 1867 साली उभारण्यात आलेला लोखंडी पूल दीडशे वर्षानंतर पुन्हा हलक्या चारचाकी वाहनांसाठी शुक्रवारपासून (दि. 27) सुरू होत आहे. पुलाच्या बांधणीस 100 वर्षांहून अधिक कालखंड झाल्यानंतर 1972 सालापासून अवजड वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला होता. तो आता खुला झाला आहे.