OBC Reservation : ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका नको - अजित पवार - अजित पवार
पुणे - राज्यात जाहीर झालेल्या सतरा जिल्ह्यातील नगरपंचायत, ( Nagar Panchayat Election ) महानगरपालिका निवडणुकीचा ( Municipal elections ) आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार पुण्यात आले आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय ( OBC reservation ) या निवडणुका होऊ नये, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ( Nationalist Congress Party ) भूमिका आहे. 12 तारखेला याचा निकाल लागणार आहे. त्यामध्ये मध्यप्रदेशला जो न्याय मिळाला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रालाही आरक्षण कोर्टाकडून मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. तसेच शिंदे सरकार आल्यापासून विकास कामांमध्ये जो बदल केला जातो. ते योग्य नाही ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे विकास कामांमध्ये राजकारण करू नये अशी आमची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.