Nagpur Mp Krida Mohatsav : कपिलदेव यांच्या बॉलिंगवर नितीन गडकरींची फटकेबाजी; पाहा VIDEO - नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस कपिलदेव
नागपूर - नागपुरात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचा ( Nagpur Mp Krida Mohatsav ) समारोप कार्यक्रम खास ठरला. कारण राजकीय फटकेबाजी करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भारताचे माजी कर्णधार कपिलदेव यांच्या बॉलिंगवर जोरदार फटकेबाजी ( Nitin Gadkari Six On Kapil Dev Bowling ) केली. यशवंत स्टेडियमवर घेण्यात आलेल्या समारोपीय कार्यक्रमाला मोठ्या संख्यने क्रीडा प्रेमींनी हजेरी लावली. खासदार महोत्सव सोहळ्यात प्रेक्षकांच्या आग्रहास्तव नितीन गडकरी आणि फडणवीस यांनी बॅटिंग केली, तर कपिलदेव यांनी बॉलिंग केली. तेव्हा नितीन गडकरींनी जोरदार फटकेबाजी करत प्रेक्षकांची मनं जिंकली.