महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Minister Nitin Gadkari: सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका; नितीन गडकरींच्या विधानाने पुन्हा एकदा चर्चांला उधाण - Agrovision Foundation Program Nagpur

By

Published : Sep 10, 2022, 4:56 PM IST

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Minister Nitin Gadkari ) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य ( Nitin Gadkari controversial statement ) करत नवीन वादाला फोडणी दिली आहे. सरकारच्या फार-काही भरवश्यावर राहू नका,मी सरकार आहे म्हणून तुम्हाला सांगतं असल्याचं म्हणाले आहे. आपल्याकडे लोकांचा विश्वास सरकार आणि परमेश्वरावर आहे. मात्र तूंच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे हे कुणीही सांगत नसल्याचं ते म्हणाले आहेत. नागपुरात आज ऍग्रोविजन फाउंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ऍग्रोविजन फाउंडेशनच्या कार्यक्रमात ( Agrovision Foundation Program Nagpur ) बोलतांना नितीन गडकरी म्हणाले की, मी कालच माझ्या शेतातली चवळीच्या शेंगाची भाजी खालली आहे. माझी शेती ऑरगॅनिक आहे. माझ्या शेतात पिकणारे उत्पादन मी पूर्ती बाजारमध्ये विकत नाही. मला अधिक भाव देणारा भाजी विक्रेता शोधला आहे. त्याचं प्रमाणे आपल्या उत्पादनाना कोण अधिक बाजारभाव देऊ शकतो हे ज्याचे त्याने शोधले पाहिजे असं देखील ते म्हणाले आहेत. प्रयत्न केल्याशिवाय काहीही मिळणार नाही - ऍग्रोविजन फाउंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी अनेक गमतीदार किती सांगितले ,त्यामुळे लोकांमध्ये एकच हशा पिकला. ते म्हणाले की आपल्याकडे दोनच गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. एक तर सरकार दुसरे म्हणजे परमेश्वर.मात्र प्रयत्न केल्याशिवायकुणालाही काही मिळत नसल्याचं ते म्हणाले आहेत. ( Nitin Gadkar is Statement Once Again Sparked Discussions Nagpur )

ABOUT THE AUTHOR

...view details