VIDEO : बंडातात्या कराडकर यांची सरकारला काळजी आहे म्हणूनच हे निर्बंध - नीलम गोऱ्हे - कोरोना निर्बंध
बंडातात्या कराडकर त्यांनी काय करावं हे मी नाही सांगू शकत, पण ते श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहेत. सरकारला वारकऱ्यांची काळजी आहे, म्हणूनच यंदाचा सोहळा अनेक नियम व अटी घालून होत आहे. अशा शब्दात विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बंडातात्या यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. तर जनतेच्या मनात असेन तोपर्यंत उद्धव ठाकरे राज्य चालवतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. याविषयी त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी..