NCP Agitation Nagpur : नागपुरात राष्ट्रवादीचे नारायण राणेंविरोधात 'चप्पल मारो आंदोलन' - नागपूर राष्ट्रवादीकडून राणें विरोधात आंदोलन
नागपूर - बंडखोर आमदारांच्या केसाला धक्का जरी लागला तर घर गाठणे कठीण करू, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांना संबोधून केले होते. या विरोधातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धमकी देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. तसेच नारायण राणे यांच्या बॅनरवरील प्रतिमेला चपला मारून निषेध करण्यात आला. नारायण राणेंना नागपुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी दिला. राणेंविरोधात पोलिसांत तक्रार करणार असल्याचेही दुनेश्वर पेठे यांनी म्हटले.