Navneet Rana Children : '...त्यात कोणता गुन्हा केला', आरोहीचा सवाल; नवनीत राणांची मुले नागपूरहून दिल्लीकडे रवाना - नवनीत राणा हनुमान चालीसा प्रकरण
नागपूर - नवनीत राणा ( Navneet Rana ) आणि रवी राणा ( Ravi Rana ) यांची मुले नागपूरहून दिल्लीला निघाले ( Navneet Rana children leave Nagpur for Delhi ) आहेत. २२ दिवसांनी आरोही आणि रणवीर हे दोघे आपल्या पालकांना भेटण्यासाठी नागपूरहून दिल्लीला रवाना झाले आहेत. यावेळी विमानतळावर आरोही हिने बोलताना सांगितले की, 'मेरी मॅमी पापाने हनुमान चालीसा पढी इसमे कोनसा गुन्हा है, किस चिज के लिए उन्हे 13, 14 दिन जेल में डाला, हम उन्हे बहुत मिस कर रहे है इस लिए उनको मिलने के लिए जा रहे है,' 'माझ्या आईवडिलांनी हनुमान चालिसाचे पठण केले त्यात कोणता गुन्हा केला, त्यांना कश्यासाठी 13, 14 दिवस तुरंगात टाकले, असा सवाल आरोहीने माध्यमांशी बोलताना केला आहे.