नंदुरबार: संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगाच्या बाजारपेठा सजल्या - पतंगाच्या बाजारपेठा सजल्या नंदुरबार
नंदुरबार जिल्हा गुजरातच्या सीमावर्ती भागात वसला आहे. गुजरातप्रमाणेच नंदुरबार जिल्ह्यातही संक्रांतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव साजरा केला जात असतो. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमधील पतंगाच्या बाजारपेठा सजल्या असून, पतंग खरेदीसाठी ग्राहकांनी दुकानावर गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.