Nana Patole on vidhan parishad election : सहाही उमेदवार बहुमताने विजयी होणार, विरोधकांचा गर्व उतरणार - नाना पटोले - विधान परिषद निवडणूक नाना पटोले प्रतिक्रिया
मुंबई - आज विधान परिषदेची निवडणूक आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी ( Nana Patole on maharashtra vidhan parishad election ) सर्वस्व पणाला लावले आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव आला होता. त्यानंतर आता विधान परिषदेतही ( maharashtra vidhan parishad election ) असेच होणार का? यावर चर्चा रंगली होती. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले आहे. महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार विजयी ( Maha vikas Aghadi candidate ) होती आणि विरोधकांचा गर्व उतरेल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज ( सोमवारी ) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ११ उमेदवार रिंगणात असून गुप्त मतदान प्रक्रिया असल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. त्यामुळे दगाफटका होण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्षांचे यामुळे धाबे दणाणले आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi In MLC Election ) आणि विरोधीपक्ष भाजपाची ( BJP In MLC ) उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. मात्र पाडापाडीचे राजकारण रंगणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपाच्या प्रसाद लाड यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
TAGGED:
Maha vikas Aghadi candidate