Nalasopara Fire News : नालासोपाऱ्यात अग्नितांडव; 30 हून अधिक दुचाकी जळून खाक - Nalasopara fire marathi news
नालासोपारा - नालासोपारा पश्चिमेकडील ( Nalasopara West Fire ) गॅलक्सी हॉटेल शेजारील दुकानांना आग लागली. या आगीमध्ये पाच ते सहा दुकाने जळून खाक झाली आहे. तर, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 30 ते 35 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. सुरुवातीला एका गादीच्या दुकानाला आग लागली आहे. या दुकानात असलेल्या कापूस आणि कपड्यामुळे ही आग लागली. या घटनेची माहिती वसई पालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले आहे. मात्र, आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.