Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात जंगी स्वागत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्राच्या राजकारणातले खरेखुरे 'कलाकार', जादुगार आणि किमयागार जर कुणी असेल, तर ते नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आहेत. अश्या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी काल विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. यामागे देवेंद्र फडणवीस यांची कर्तबगारी असल्याचे देखील त्यांनी मान्य केले आहे.