VIDEO : संगीत दरबाराच्या माध्यमातून लोकराजाला स्वरांजली! - राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वा निमित्त जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर संगीत दरबार (Music concert in Kolhapur) शास्त्रीय गायन, सुगम, नाट्य गायन, वाद्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली. कोल्हापूरातल्या अनेक संगीत रसिकांनी गायन, सतार आणि तबला वादन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. गुणीदास फाऊंडेशन, शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभाग, आणि गायन समाज देवल क्लब यांच्यावतीने हा कार्यक्रम पार पडला.