महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Spiritual Leader Murder : नाशिक पोलिसांचा खुलासा! पैशांच्या वादातून मुस्लिम धर्मगुरू सुफी चिस्ती यांचा खून - सुफी यांची हत्या ड्रायव्हरनेच केली

By

Published : Jul 6, 2022, 1:08 PM IST

येवला येथील एक चिंचोली एमआयडीसी परिसरात झालेल्या अफगाणिस्तानी सुफी धर्मगुरूच्या हत्येबाबत ( foreign citizen murder ) नाशिक पोलीस अधीक्षक सचिन पाटील ( Nashik Superintendent of Police Sachin Patil ) यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार ही हत्या सुफी यांच्या ड्रायव्हरने केल्याचे निष्पन्न झाला आहे. प्रॉपर्टी आणि पैशावरून सुफी चिस्ती याचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या इतरही काही कारण आहे का याबाबत पोलीसांचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. या प्रकरणात एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुफी धर्मगुरू यांचा ड्रायव्हर आणि इतर तीन जण फरार झाले असून पोलीस पथक फरार आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत, असेही पोलिसांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details