महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Pakistan Street Jalna : चक्क परतुरमध्ये 'पाकिस्तान गल्ली'; भाजपा आमदारांनी केला निषेध - चक्क पाकिस्तान गल्ली जालना

By

Published : May 24, 2022, 5:20 PM IST

जालना - परतुरमध्ये एका गल्लीचे नाव चक्क पाकिस्तान गल्ली असे आढळून आले आहे. परतूर नगर पालिकेच्या मालमत्ता कर आकारणीच्या पावतीत हा प्रकार समोर आला आहे. सध्या परतूर नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्यातच परतुरमध्ये पाकिस्तान गल्ली ( Pakistan street in Partur ) असल्याचा उल्लेख पालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या मालमत्ता कर आकारणीच्या पावतीत आढळून आल्याने संतापाची लाट उसळली आहे. शिवाय पालिकेत चाललेला अनागोंदी कारभार देखील या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान परतुरचे भाजपा आमदार बबनराव लोणीकरांनी ( BJP MLA Babanrao Lonikar ) यावर सवाल उपस्थित करत परतुरमध्ये काँग्रेसला पाकिस्तान निर्माण करायचा आहे का? असा सवाल उपस्थित करत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details