Mungantiwar on Vekoli officer : वेकोली अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणावर भडकले मुनगंटीवार; पूरग्रस्तांना त्वरित मदत करण्याची दिली ताकीद - WESTERN COALFIELD LIMITED
गेल्या काही दिवसांपासुन चंद्रपूर (Chandrapur District) जिल्ह्याला पुराने वेढा घातला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची विचारपूस करण्यासाठी (Sudhir Mungantiwar) आमदार सुधीर मुनगंटीवार तेथे पोहचले. मात्र,अतीशय हृदयद्रावक परिस्थिती असतांना देखील, काही गोष्टींमधुन अधिकारी वर्गाची असंवेदनशीलता पुढे आली. आणि यामुळे अधिकारी वर्गावर (Mungantiwar erupted on Vekoli officer) मुनगंटीवार चांगलेच भडकले. पुराची सर्वाधिक झळ पोचलेल्या भद्रावती तालुक्यातील, पळसगाव येथे, ग्रामस्थांनी सुरक्षित स्थळ म्हणून वेकोलिचे सभागृह मागितले होते. मात्र, ते देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. 'काही तासात मदत पोचवा, अन्यथा हिशोब करतो',असा दम देतांनाचा मुनगंटीवार यांचा व्हिडिओ वायरल झालाय. या गावाच्या आसपास कोळसा खाणीतील मातीचे महाकाय ढिगारे चुकीच्या पद्धतीने उभे केल्याने, गावाला पुराचा फटका बसला. मात्र सरकारी कोळसा कंपनी असलेल्या (WESTERN COALFIELD LIMITED) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांप्रती हलगर्जीपणा दाखवत, महापुरात मदत नाकारली. त्यामुळे संतापलेल्या मुनगंटीवारांनी अधिकारी वर्गाला फैलावर घेतल्याचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय.