Mumbai Rain Updates : हिंदमाता परिसरात पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून शोधावी लागते वाट; पाहा व्हिडिओ - मुसळधार पाऊस
मुंबई : गेल्या 24 तासापासून मुंबई मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने अचानक काल जोरदार हजेरी लावल्यामुळे मुंबईकरांनी आनंद व्यक्त केला असला तरी, मुंबईच्या अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे पाणी साठल्याचा चित्र पाहायला मिळाले. खास करून मुंबईच्या हिंदमाता, किंग सर्कल, सायन, गांधी मार्केट या परिसरात पाणी साठायला सकाळपासून सुरुवात झाली होती. त्यामुळे आपल्या कार्यालयात निघालेला मुंबईकरांना सकाळी जोरदार पावसामुळे त्रास झालेला पाहिला मिळाला. ( Mumbai Rains Updates )
Last Updated : Jul 5, 2022, 3:12 PM IST