महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, 14 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट - हवामान विभाग

By

Published : Jul 12, 2022, 11:04 AM IST

मुंबई - गेल्या आठवड्यात मुंबई, मुंबई उपनगर येथे जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. मात्र, मागील 2 दिवसापासून मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, अधून- मधून पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत ( Maharashtra Rain ). मात्र, सकाळपासूनच मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने ( Meteorological Department ) मुंबई ठाणे आणि मुंबई उपनगर अशा तिन्ही जिल्ह्याला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचण्यात काही अडचणी होत आहेत. मात्र, सकाळपासून पाऊस सुरू असतानाही लोकल सेवेवर अद्याप कोणताही परिणाम झालेला नाही. तर तिथेच रस्ते वाहतूकही व्यवस्थित आहे. अद्याप मुंबईच्या रस्त्यांवर सखल भागात पाणी साठलेलं नाही. मात्र, असाच पाऊस पडत राहिला तर मुंबईच्या सकल भागात पाणी साठण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराच्या बाहेर निघताना पावसाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावं असं आवाहन पालिका प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details