Mumbai Mansoon Update : मुंबईत पावसाला सुरुवात; किनारपट्टीवरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा - मुंबई पाऊस मराठी बातमी
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा सुरुवात केली ( Mumbai Mansoon Update ) आहे. मुंबईत काल ( 30 जून ) रात्रभर जोरदार पाऊस ( Heavy Rain In Mumbai ) झाला. तर, काही भागात त्यामुळे पाणी साठले होते. वाहतूक कोंडीवर याचा परिणाम झाला, रेल्वे वाहतूक उशिराने धावत होती. मुंबईकरांचे यात मोठे हाल झाले. मात्र, दुसरीकडे पावसाने सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला आहे. जून महिना कोरडा गेल्याने पेरणीची काम झाल्यानंतर शेतीचे काम खोळंबून होती. पण, पाऊस सुरू झाल्याने शेतीच्या कामाला देखील वेग येणार आहे. तसेच, समुद्र किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना आणि कोळी बांधवांना सतर्कता इशारा आपात्कालीन विभागाने दिला आहे.