महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Mumbai Disaster Management : 'मुंबईच्या प्रत्येक ठिकाणी आमची नजर'; मनपाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग अशा पद्धतीने करते काम - Mumbai Municipal Corporation Disaster Management

By

Published : Jul 6, 2022, 10:17 PM IST

मुंबई - मुंबईतील नैसर्गिक आपत्ती ( Mumbai Disaster Management ) रोखण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन विभागातून केले जाते. मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने ( Heavy Rain In Mumbai ) मुंबईला झोडपून काढले आहे. अनेक सखल भागात पाणी साचले. या साचलेले पाणी, रस्त्यांवरील खड्डे, कचरा आदी तक्रारी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे येताच तात्काळ निपटारा केला जातो. पालिकेने यासाठी स्वतंत्र वेबसाईट आणि ऍप बनवून जास्तीत जास्त नागरिकांच्या सोशल मीडियावरील तक्रारी सोडवत असते. कोंकणसह मुंबईत अतिवृष्टी होण्याचा पूर्व इशारा वेधशाळेने दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत अतिवृष्टी झाल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी मुंबई पालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयाच्या नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई महापालिकेचे काम कशा पद्धतीने चालते याबाबत मुंबई मनपा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर ( Mahesh Narvekar, Director, Mumbai Municipal Corporation Disaster Management ) यांच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने संवाद साधला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details