Accident CCTV Video : सी-लिंकवर पक्ष्याचे प्राण वाचवणे बेतले जीवावर; टॅक्सीने दिलेल्या धडकेत दोन जणांना मृत्यू - Two killed in taxi crash on C link road
मुंबई - मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर ( C link road ) झालेल्या अपघाताचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये गाडी चालक व मालक हे एका पक्ष्याचे प्राण वाचवण्यासाठी गाडीतून खाली उतरतात. याच वेळेत मागून येणाऱ्या कारने त्यांना भीषण धडक दिली. या अपघातात प्राणी अमर मनीष जरीवाला यांचा जागीच मृत्यू झाला ( Two killed in taxi crash on C link road ) होता. तर त्यांचे चालक हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. ( Mumbai Accident CCTV Video )